Wednesday, February 6, 2019

माझ्या प्रिय मना

माझ्या  प्रिय  मना 
किती  तू  भटकशील...
किती तू  सावरशील...
तरी सुद्धा तुला चालता आलं नाही...

माझ्या  प्रिय  मना 
किती  तुला  समजावलं
किती  तुला  स्वीकारलं
किती  तुला  नाकारलं
तरी  सुद्धा  तू  पिच्छा सोडवत  नाहीस

माझ्या  प्रिय मना
तू  दोस्त  आहेस  कि  दुश्मन
आपला  आहेस  कि  बेगाना
तू  आहेस  तरी  कुणाचा
हेच  मला  समजत  नाही

माझ्या  प्रिय मना
खूप अंतर पार केलं मी
खूप चाललो मी
खूप थकलो मी
तरी सुद्धा तुझी वाट संपत नाही

माझ्या  प्रिय मना
पुढे काही वाट दिसत नाही
पुढे काही ध्येय दिसत नाही
तरी सुद्धा प्रकाश तू का दाखवत नाहीस

माझ्या  प्रिय मना...................................



-अमोल नाकवे 

No comments:

Today's Sunrise