Friday, February 8, 2019

पंढरीची वारी दिल्लीच्या द्वारी

पंढरीची वारी दिल्लीच्या द्वारी

फरिदाबाद, हरियाणा (राष्ट्रीय राजधानी क्षेत्र ) येथे आयोजित होत असलेल्या ३३ साव्या आंतरराष्ट्रीय सुरजकुंड मेळाव्यात सहभागी होत असताना पंढरपूरची कीर्तन मण्डळी. ( सौजन्य: अमोल नाकवे)
दिल्ली क्षेत्रात फरिदाबाद येथे आयोजित ३३ साव्या आंतराष्ट्रीय सुरजकुंड मेळाव्यात यंदा महाराष्ट्राचे पथक खूब जोर शोरात सहभागी झाले आहे. भजन, लावणी आणि तलवारबाजी ह्या पथकांची रोजदार चर्चा प्रेक्षकांकडून होत आहे. महाराष्ट्र पर्यटन विभागाद्वारे येथे पर्यटनाला चालावा मिळण्यासाठी स्टॉल देखील लावण्यात आला आहे आणि देश विदेशालीत पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. महाराष्ट्रातील कालाकारांद्वारे करण्यात आलेला प्रयत्न अतिशय साहारणीय आहे. सुरजकुंड मेळा हा गेल्या ३३ वर्षांपासून सांस्कृतिक आणि वाणिज्य स्तरावर देशातील आणि वेदेशातिक लोकांना एक मंच उपलब्ध करून देत आहे.

-अमोल नाकवे

Thursday, February 7, 2019

शेतकऱ्यांचे बजेट

शेतकऱ्यांचे बजेट 


१ फेब्रुअरी २०१९ हा दिवस देशातल्या शेतकऱ्यांसाठी खासकरुण महत्वाचा म्हणावा लागेल. केंद्रीय प्रभागी अर्थमंत्री श्री पीयूष गोयल यांनी लोकसभेत देशाच्या २०१८ – २०१९ वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प पेश केला. अर्थसंकल्प म्हणजे वर्षभराचे आर्थिक समायोजन. ज्या संकल्पात आर्थिक धोरणे जाहीर होतात त्यास अर्थसंकल्प असे म्हणतात. सर्व क्षेत्रातल्या दिग्गजांची नजर ह्या वर्षीच्या बजेट होती. येणाऱ्या आर्थिक वर्षात कुणासाठी काय असेल याची उत्त्सुकता सर्वच करीत होती. ह्या अर्थसंल्पाला विषेश महत्व ह्या साठी दिले जात आहे कारण कि हे मोदी सरकारचे हे निवडणुकीच्या पूर्वसंध्येला याची प्रस्थावना करण्यात आली आणि सर्व स्थरावर जोरदार प्रतीक्षा करण्यात आली.

भारताची ६०% जनसंख्या अजुनसुधा कृषि क्षेत्रवार निर्भून आहे. १७% देशाचे उत्पन हे कृषि क्षेत्रा पासून होते. जनसंख्येचा बाबतीत विश्वातल्या दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या देशात आपला शेतकरी हा लोकांची अन्नधान्याची गरज पूर्ण करतो. ह्याच कारणांमुळे कृषि क्षेत्राचे देशाच्या आर्थिक बजेट मध्ये विशेष महत्व प्राप्त होते.
 
शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यन्त दोन पटीने वाढावे ह्या धोरणावर आधारित कृषि क्षेत्रावर केंद्रित असलेले हे बजेट असून या द्वारा एक नवा पाया उभारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
अर्थ मंत्र्यांनी प्रधान मंत्री किसान सम्मान निधी योजना घोषित केली. ह्या योजनेद्वारे २ हेक्टर पर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये त्यांच्या बँक खात्यात टाकण्यात येतील. ह्या योजनेचा फायदा १२ करोड शेतकयांना होणार असून ह्यासाठी ७५००० करोड रुपये प्रस्थावित करण्यात आले आहेत. ह्या योजनेद्वारे शेतकरी गरजेच्या वेळी पैसे वापरू शकतात.

देशाचे प्रसिद्ध अर्थशाश्रज्ञ डॉ. स्वामीनाथन यांनी ह्या बजेटची स्तुति केलि असून. यंदाचा बजेट कृषि क्षेत्राला नवी दिशा देणार आणि युवकांना शेतीकडे आकर्षित करणारा ठरेल असे मत त्यानी बजेट वरील प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले. कृषिला व्यवसायकता देण्याचे त्यानी कौतुक केले. महत्वाचा पैलू असा कि कर्जमाफी हा परिपूर्ण मार्ग नसून प्रधान मंत्री किसान सम्मान योजना ह्या सारख्या योजना कृषी व्यवसायाला चालणा देऊ शकतील.

ह्या व्यतिरिक्त पशुपालन आणि मत्स्यपालन व्यवसायासाठी किसान क्रेडिट कार्ड द्वारा कर्ज घेतलेल्या आणि वेळेवर कर्ज रक्कम फेडीत असलेल्या शेतकयांना २%ची सुठ देण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.

वैज्ञानिकांच्या अंदाजा नुसार ह्या वर्षी पाऊस ऋतु चांगला असेल, गेल्या वर्षा सारखी दुष्काळजन्य परिस्थितिचा शेतकऱ्यांना सामना करावा लागणार नाही. निसर्ग आणि योग्य असे पूरक शाशकीय धोरण असणारे हे वर्ष भारतीय कृषि क्षेत्राला नवी दिशा देवू शकेल. आणि कृषि हा पुनः आपले गत वैभव प्राप्त करेल अशी अपेक्षा आपन करू शकतो.

बजेट किती चांगले की वाइट हा एक चर्चेचा विषय असू शकतो. पण कृषि हा एक भारतीय अर्थकारनाचा एक अविभाज्य घटक असून बजेट मधील प्रावधान नक्कीच कृषि क्षेत्राला नवी दिशा देणारे ठरतील.

(लेखक सध्या देशातल्या एका नामवंत कौशल विकसित करणाऱ्या संस्थेत कार्यरत असून, ही संस्था ह्या क्षेत्रात एक प्रगतीशील संस्था समजली जाते. Email ID: nakveamol1@gmail.com )

ह्या लेखात व्यक्त केलेले विचार हे वक्तिगत आहेत.

- अमोल नाकवे

Wednesday, February 6, 2019

माझ्या प्रिय मना

माझ्या  प्रिय  मना 
किती  तू  भटकशील...
किती तू  सावरशील...
तरी सुद्धा तुला चालता आलं नाही...

माझ्या  प्रिय  मना 
किती  तुला  समजावलं
किती  तुला  स्वीकारलं
किती  तुला  नाकारलं
तरी  सुद्धा  तू  पिच्छा सोडवत  नाहीस

माझ्या  प्रिय मना
तू  दोस्त  आहेस  कि  दुश्मन
आपला  आहेस  कि  बेगाना
तू  आहेस  तरी  कुणाचा
हेच  मला  समजत  नाही

माझ्या  प्रिय मना
खूप अंतर पार केलं मी
खूप चाललो मी
खूप थकलो मी
तरी सुद्धा तुझी वाट संपत नाही

माझ्या  प्रिय मना
पुढे काही वाट दिसत नाही
पुढे काही ध्येय दिसत नाही
तरी सुद्धा प्रकाश तू का दाखवत नाहीस

माझ्या  प्रिय मना...................................



-अमोल नाकवे 

Color among colors!

Color among colors! Clicked at Aurangabad, Maharashtra, India.